Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद… अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड

Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद… अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड

| Updated on: Jun 29, 2026 | 1:37 PM

छत्रपती संभाजीनगर शहरातील राजीव नगर परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्याकांडात झाले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका तरुणाची चाकू आणि विटांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत आरोपी आणि मृत तरुण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने तरुणावर चाकूने वार करत विटांनी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वेदांत नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला अटक केली. आरोपीची कसून चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वेदांत नगर पोलीस करत आहेत.

Published on: Jun 29, 2026 1:37 PM
Follow Us