Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन

Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन

| Updated on: Sep 04, 2026 | 1:19 PM

सीजेपीने दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या वादग्रस्त व्हिडिओविरोधात आंदोलन केले. जंतरमंतर आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्याची कबुली कार्यकर्त्याच्या पॉडकास्टमध्ये होती. निशू आझाद यांच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल करण्याची सीजेपीची मागणी आहे. खासदार चंद्रशेखर आझादही उपस्थित होते.

दिल्लीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या एका वादग्रस्त व्हिडिओवरून सीजेपी (Cockroach Janata Party) आक्रमक झाली आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर सीजेपी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असून, संबंधित कार्यकर्त्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा (खुनाचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

निशू आझाद नामक युवतीने यापूर्वी जंतरमंतर आंदोलनादरम्यान आपल्या वडिलांवर हल्ला झाल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यामागे याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा हात असल्याचे तिने म्हटले होते. त्यानंतर आता या कार्यकर्त्याने एका पॉडकास्ट व्हिडिओमध्ये आपणच ती मारहाण केल्याचे उघडपणे कबूल केले आहे. त्याने सांगितले की, या मारहाणीत संबंधित व्यक्तीला सात टाके पडले होते, तरीही त्याला अटक झाली नाही आणि तो मोकळा फिरत आहे.

या कबुलीजबाबाच्या व्हिडिओनंतर सीजेपीने कठोर भूमिका घेतली आहे. सीजेपीचे सौरभ दास, आशुतोष रांका आणि खासदार चंद्रशेखर आझाद हे देखील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनात सहभागी झाले आहेत. मारहाणीची कबुली देणाऱ्या कार्यकर्त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.

Published on: Sep 04, 2026 1:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us