CJP Protest : नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, अभिजित दिपके नागपूरला रवाना

CJP Protest : नागपूरमध्ये उद्या कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा, अभिजित दिपके नागपूरला रवाना

| Updated on: Nov 25, 2026 | 12:07 PM

नागपुरात संविधान दिनानिमित्त कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) उद्या मोर्चा काढणार आहे. अभिजीत दीपके यांनी सरकारला संविधानविरोधी ठरवत, देशातील सध्याची परिस्थिती तानाशाहीकडे झुकत असल्याचे म्हटले आहे. मोर्चाला परवानगी असून, महाराष्ट्र पोलिसांचे सहकार्य लाभल्याचे दीपके यांनी नमूद केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही प्रमुख मागणी आहे.

नागपूरमध्ये उद्या, संविधान दिनानिमित्त, कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) तर्फे एक मोर्चा काढण्यात येणार आहे. सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथून नागपूरकडे प्रस्थान केले आहे. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, सत्तेत असलेले लोक संविधानविरोधी मानसिकतेचे आहेत आणि देशात तानाशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

दीपके यांनी स्पष्ट केले की, मोर्चासाठी आवश्यक परवानगी मिळाली आहे आणि पोलिसांकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखे नसून, ते आम्हाला सहकार्य करत असल्याचे दीपके यांनी सांगितले. उद्याचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरच हा देश चालेल, असा संदेश देण्यासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मोर्चाची मुख्य मागणी म्हणजे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा. देशातील निवडणुका पूर्णपणे पारदर्शक आणि स्वतंत्रपणे होत नसतील, तर अशा निवडणुकांचा काय फायदा, असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला. विशाल रायपुरे आणि ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही नाईन मराठी, छत्रपती संभाजीनगर.

Published on: Nov 25, 2026 12:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us