Buldhana Chikhla News | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

Buldhana Chikhla News | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 21, 2026 | 4:32 PM

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून काल रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या घटनेत एका महिलेला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या मुद्द्यावरून काल रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
या घटनेत एका महिलेला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास 200 ते 300 महिला आणि पुरुष एकत्र येऊन त्यांच्या गटावर हल्ला केला. सुमारे 30 ते 35 जणांनी महिलेला घेरून तिच्या अंगावरील कपडे फाडत मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही महिलांनी पोलिसांनाही घेराव घातल्याचे पीडित महिलेने सांगितले. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे. तसेच घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप न करता प्रकार पाहत राहिल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Published on: Feb 21, 2026 04:31 PM