खोके, 50 कोटी, ट्रक… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणितच मांडलं, विरोधकांना काय उत्तर दिलं?

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Dec 02, 2022 | 10:59 AM

आठवले साहेबांनी सांगितलं त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. त्यासाठी मानसिक उपचार केला जातो.  आमच्या ठाण्याला असे उपचार आहे, असा टोमणादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

खोके, 50 कोटी, ट्रक... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणितच मांडलं, विरोधकांना काय उत्तर दिलं?
Image Credit source: social media

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी विरोधकांकडून होणाऱ्या खोक्यांच्या (Khoke) आरोपांना एका कार्यक्रमात सडेतोड उत्तर दिलं. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या धाडीत एका अभिनेत्रीच्या घरी २० कोटी रुपये सापडले. ते नेण्यासाठी ईडीला एक मोठा टेम्पो मागवावा लागाला. इथे पन्नास खोक्यांचा आरोप करता तर किती ट्रक लागले असते, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबईत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात हे गणित समजावून सांगितलं.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेदेखील उपस्थित होते. त्यांनी खास स्टाइलने महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते सारखं म्हणतात खोके… त्यांचं बिघडले आहेत डोके… अशी कविता आठवले यांनी केली. पण एकनाथ शिंदे यांच्या सरकारमागे खोक्यांचा काहीही संबंध नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं.

तोच धागा पकडत एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, ‘ बंगालमध्ये एका सिनेअभिनेत्रीकडे 20 कोटी रुपये पकडले होते. 20 कोटी रुपये नेण्यासाठी एक मोठा टेम्पो लागला. आता पन्नास कोटी नेण्यासाठी एक मोठा ट्रक लागेल. 50 गुणिले 50 म्हणजे किती ट्रक लागतील… हे लपेल का? हे बोलायचं म्हणून बोलायचं

आठवले साहेबांनी सांगितलं त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. त्यासाठी मानसिक उपचार केला जातो.  आमच्या ठाण्याला असे उपचार आहे, असा टोमणादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI