CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या

CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या

| Updated on: Aug 31, 2026 | 7:54 PM

कॉकरोच जनता पार्टीने ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत मोर्चाची घोषणा केली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने हा मोर्चा काढला जात आहे. केंद्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली असून, उद्या यावर सुनावणी होणार आहे. हा मोर्चा रोखण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

कॉकरोच जनता पार्टीने ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत मोर्चाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने पूर्वी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, या कारणास्तव हा मोर्चा काढण्यात येत आहे. २५ जुलै रोजी जंतर मंतर येथील आंदोलन मागे घेताना सरकारने आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आणि आयुष्य संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या दोन्ही मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

मोर्चाच्या काही दिवस आधी केंद्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे आंदोलकांवरील गुन्हे कलम १४२ नुसार रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या कृतीमुळे ५ सप्टेंबरचा मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेमुळे मोर्च्याला परवानगी न देण्याची मागणी करणारी दुसरी याचिका सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. उद्या (२९ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 31, 2026 7:53 PM
Follow Us