मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य, कोणाचा मुख्यमंत्री होणार नाना पटोले यांनी थेट सांगितलं

मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य, कोणाचा मुख्यमंत्री होणार नाना पटोले यांनी थेट सांगितलं

| Updated on: Apr 26, 2023 | 11:05 AM

VIDEO | 'मविआ'मध्ये बिघाडी?...तर काँग्रेसचा प्लॅन तयार, नाना पटोले यांनी नेमकं काय केलं सूचक विधान?

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नागपुरात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री जनता ठरवते. आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य नाही. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीदावर चर्चा करण्याचं कारण नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा चर्चा होईल. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं थेट नाना पटोले म्हणाले. यासह गेल्या काही दिवासांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या येत्या 2024मध्ये आघाडी म्हणून लढू की नाही हे आताच कसं सांगू? या विधानावरून आघाडीत बिघाडी असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे. पण आघाडी नाही झाली तर आमचे सर्व प्लॅन तयार आहेत, असं नाना पटोले म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Published on: Apr 26, 2023 11:00 AM
Follow Us