पश्चिम महाराष्ट्राला कोकण जोडले जाणार, १०८ किमीच्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार
पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेने जोडावे अशी अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या १०८ किमीच्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा १०८ किमीचा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. या मार्गामुळे कोकणाला जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून थेट मार्ग होणार आहे. या मार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) सादर करण्यात आला आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग १०८ किलोमीटरचा असून आधीच्या योजनेनुरुप या मार्गावर उपळे, सैतवडे ,कळे,भुई कसबा- बावडा, मार्केटयार्ड आदी १० स्थानके असणार आहेत. यामार्गावर ताशी ११० किलो मीटर वेगाने रेल्वे धावू शकणार आहे. या प्रकल्पासाठी ६८३ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. करुळ घाट आणि भुईबावडा घाट चुकवत वळसा घालत हा रेल्वे मार्ग जात असल्याने थोडे अंतर वाढणार आहे.
Published on: Mar 28, 2026 2:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
