Ajit Pawar | कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन, मराठवाड्यात झालेली नुकसान आणि हायवेच्या जमिनींचं संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन, मराठवाड्यात झालेली नुकसान आणि हायवेच्या जमिनींचं संपादन याविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. 75 तास लसीरकरण करण्याचा आमचा मानस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. सीएसआरमधून 5 लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले. कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या एक लाख सिरींज पुणे शहरात सिरींज घेण्यात आली आहेत. आम्ही ग्रामीण भागातही सिरींज देणार आहोत, असं पवार यांनी स्पष्ट केलं. पुणे महापालिकेत 2.1 कोरोनाबधित रेट आहे. कोरोनाची मागच्यावेळी पेक्षा परिस्थिती सुधारली आहे. पुण्यातील मृत्युदर 2.1 आला आहे. पिंपरीचा थोडासा मृत्युदर वाढला आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
