Ajit Pawar : चुलत्या-पुतण्याचं मला नका सांगू… अजित दादांची पुण्याच्या कार्यक्रमात तुफान टोलेबाजी, पत्रकारांचीही केली नक्कल
पुण्यात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. चुलत्या-पुतण्याचं मला नका सांगू असं म्हणत त्यांनी राजकीय टीकाकारांना उत्तर दिलं. तसेच, पत्रकारांची नक्कल करत उपस्थितांना हसवलं. या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
पुण्यात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना चुलत्या-पुतण्याचं मला नका सांगू अशा शब्दांत विरोधकांना सुनावलं. यावेळी त्यांनी पत्रकारांची नक्कल करत वातावरण आनंदी केले. त्यांनी पुढे मिश्कीलपणे बोलताना स्पष्ट केले की, त्यांना मागच्या पिढीचं, आताच्या पिढीचं किंवा पुढच्या पिढीचं कोणी काही सांगू नये. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना हसत खेळत आणि विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा सल्ला दिला. कधी कधी तुम्हाला राग येईल, लोकं वाईट बोलतील, पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणायचं आणि सोडून द्यायचं, असं ते म्हणाले.
या कार्यक्रमात अजित पवार यांनी काही जणांनी त्यांची साथ सोडून पालकमंत्री बनण्याची स्वप्ने पाहिल्याचा उल्लेख केला. माझ्याच भावकीतील काही लोकं मला सोडून गेले, कारण त्यांना वाटलं की आता आपलं सरकार येणार आणि आपण पालकमंत्री होणार. पण आता मी त्यांना पाडणार आणि ते कसे निवडून येतात ते बघणार, असं आव्हान त्यांनी दिलं.
