दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक, ईडीनं घेतलं ताब्यात

| Updated on: Mar 21, 2024 | 10:44 PM

दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलं आहे.

Follow us on

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४ : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दोन तास चौकशी झाल्यानंतर ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं आहे. याआधी केजरीवाल यांना ईडीकडून नऊ वेळा समन्स बजावण्यात आल होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यानंतर हायकोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून केजरीवाल यांनी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावलाय. त्यानंतर ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झालं. मात्र आपने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, . रात्रीच या प्रकरणात सुनावणी व्हावी अशी आपची मागणी आहे. त्यामुळे काय होतं. याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.