Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 07, 2026 | 6:29 PM

दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जंतर-मंतरकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर तणाव वाढला आहे. बसच्या चाकातील हवा काढल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घटनास्थळीच ठिय्या दिला असून, कार्यकर्त्यांनाही तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे. वोट चोर गद्दी छोडच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

दिल्लीत काँग्रेस पक्षाचा जंतर-मंतरकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बसच्या चाकातील हवा काढल्याने काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. या घटनेनंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.

सांगरीला हॉटेलबाहेर जंतर-मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. मोर्च्यामध्ये सहभागी खासदार आणि कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस रोखण्यात आल्या. बसच्या चाकातील हवा काढल्यानंतर संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी बसची काच फोडण्याचा प्रयत्न केला. प्रियंका गांधी देखील खाली उतरून परिस्थितीचा आढावा घेताना दिसल्या, तर राहुल गांधी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा आणि तिथेच ठिय्या देण्याचा सल्ला देत होते.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना भरून नेण्यासाठी बसेस मागवल्या असून, मोठा गोंधळ सुरू आहे. “वोट चोर गद्दी छोड” आणि “ज्ञानेश कुमार वोट चोर है” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Published on: Oct 07, 2026 6:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us