चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला… अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळचं सांगितलं

| Updated on: May 10, 2026 | 4:55 PM

भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते

भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण एका वर्षाआधीच जगासमोर आणणाऱ्या दत्तत्रय खेमनार या पत्रकारांनी चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या वृत्तपत्राने ही बातमी छापली, त्यावेळी चाकणकरांनीच प्रकरण बंद करण्यासाठी दबाव टाकला होता. त्यांनी एका पत्रकाराला प्रकरण जगासमोर आणल्यामुळे त्रास दिला, असे ते म्हणाले.

पुढे दत्तात्रय खेमनार यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील अनेक पुरावे त्यांनी एसआयटीकडे दिले आहेत. त्यामुळे चाकणकरांना लवकरात लवकर सहआरोपी करावे.

Published on: May 10, 2026 4:55 PM
Follow Us