कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI तंत्रज्ञान; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन; फडणवीसांनी सगळं सांगितलं!

| Updated on: May 21, 2026 | 4:43 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन याविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याच निर्णयांबाबत फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन याविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याच निर्णयांबाबत फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

राज्य सरकारने येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा केलेली आहे. या घोषणेनंतर आता या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता खरीप हंगाम जवळ आला आहे. हंगाम सुरू होण्याआधी लवकर ही कर्जमाफी अमलात आली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबतच आता मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. यातील एक निर्णय हा कर्जमाफी संदर्भात आहे, तर दुसरा निर्णय हा क्रॉपलोनसाठीचा आहे.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका एआय ॲपबाबत सांगितलं. या ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना हवामान, पावसाचा अंदाज तसेच इतर शेती संबंधित उपयुक्त माहिती मिळेल. या ॲपचं नाव ‘साथी ॲप’ असेल.

Published on: May 21, 2026 4:43 PM
Follow Us