तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे… दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!

तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे… दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!

| Edited By: | Updated on: Jul 25, 2026 | 11:42 AM

केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांवर अखेर स्वतः मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेनंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. याचदरम्यान त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही, “मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” अशी प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर टीव्ही9 मराठीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जे दिलं आहे ते उत्तम आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे… मी जे मिळालं आहे त्यात समाधानी आहे.” या वक्तव्यातून त्यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ कार्यकाळाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, “पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत काम करत राहायचं आहे. पदावर किती काळ राहिलो हे महत्त्वाचं नाही, तर त्या काळात किती चांगली कामं केली हे महत्त्वाचं आहे. पांडुरंगाच्या कृपेने भविष्यातही जनतेसाठी चांगली कामं करण्याची संधी मिळेल, असा मला विश्वास आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना मोठा विराम मिळाल्याचे मानले जात आहे.

Published on: Jul 25, 2026 11:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us