देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल

| Updated on: Aug 02, 2026 | 11:23 AM

देशाच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता असून, देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागू शकते, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘नरेंद्र मोदींच्या यांच्या मनात एक नेता आहे. शिक्षण खात्यावर दूरदृष्टीचा उच्च शिक्षित चांगला प्रशासक नेमावा. आता देशात उत्तम शिक्षणमंत्री कोण होऊ शकेल, तर त्यांचं नाव देंवेंद्र फडणवीस आहेत. ते नरेंद्र मोदींनाही माहिती आहे. पंतप्रधान मोदींनीही चर्चा केली आहे. आता त्याला मनुष्यबळ विकास खाते म्हणतात. फार मोठं खाते आहे. मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी घ्यावी, अशी सूचना मोदींनी फडणवीसांना दिली आहे, असे राऊतांनी सांगितलं.

राऊत पुढे म्हणाले, ‘अशी माहिती माझ्याकडे आहे. कोणी कितीही नकार दिला. तरी ही माझी आहे.’ दिल्लीतील आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींना भविष्यात माघार घ्यावी लागू शकते, असाही दावा त्यांनी केला. त्यामुळे फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Aug 02, 2026 11:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us