Devendra Fadnavis | भारत-अमेरिका कराराबाबत अफवा; सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका

Devendra Fadnavis | भारत-अमेरिका कराराबाबत अफवा; सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका

| Updated on: Feb 14, 2026 | 4:27 PM

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत काहीजण चुकीच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भारताने आपली कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केल्याची चर्चा चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, राज्यात सोयाबीनला चांगला भाव मिळू लागला असताना काही लोकांनी अमेरिकेचे सोयाबीन भारतात येणार असल्याची अफवा पसरवली.

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत काहीजण चुकीच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भारताने आपली कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली केल्याची चर्चा चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, राज्यात सोयाबीनला चांगला भाव मिळू लागला असताना काही लोकांनी अमेरिकेचे सोयाबीन भारतात येणार असल्याची अफवा पसरवली. या अफवेमुळे सोयाबीनचे दर सुमारे 500 रुपयांनी घसरले, असा दावा त्यांनी केला. “भारत-अमेरिका करारात कुठेही सोयाबीन किंवा कापूस आयात करण्याबाबत उल्लेख नाही. कोणतेही सोयाबीन किंवा कापूस परदेशातून येणार नाही,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी क्षेत्राबाबत कोणताही करार होणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. काही मतप्रवाह जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, असा टोला लगावत फडणवीस यांनी अशा अफवा पसरवणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला.

Published on: Feb 14, 2026 04:27 PM