धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच… मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परळीतील एका उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय कमबॅकच्या चर्चांना वेग आला आहे.

कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण नियमित जिम करत असल्याचे सांगितले. तसेच स्वतःचे वजन कमी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. “सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झाल होतं, पण येणारा काळ आपला आहे,” असे मुंडे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी आपल्या आरोग्याबाबतही माहिती दिली. “मी स्वतः जिम करतो बऱ्यापैकी मी स्वतः माझं वजन कमी केलं आहे, असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झाल होतं, पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण चांगलं फिट राहिला पाहिजे. यासाठी मी आता जीम करतोय,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंडे यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘येणारा काळ आपला आहे’ या विधानामुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे.