Dhananjay Munde : अखेर तारीख आली समोर? धनंजय मुंडे ‘या’ दिवशी खाली करणार सरकारी सातपुडा बंगला!

Dhananjay Munde : अखेर तारीख आली समोर? धनंजय मुंडे ‘या’ दिवशी खाली करणार सरकारी सातपुडा बंगला!

Harshada Shinkar | Updated on: Sep 17, 2025 | 3:47 PM

धनंजय मुंडे यांनी मार्चमध्ये मंत्रीपद सोडले असले तरीही ते अद्याप सातपुडा सरकारी बंगला सोडण्यास तयार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करतील, त्यानंतर हा बंगला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मिळेल.

मार्च महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी सातपुडा सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत आपला सरकारी सातपुडा बंगला खाली करणार असून त्यांनी तसे आश्वासन छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला दिले आहे. छगन भुजबळ हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असून, त्यांना शासकीय निवासस्थानाची प्रतीक्षा आहे. जेव्हा धनंजय मुंडे यांनी बंगला सोडतील त्यानंतर तो बंगला छगन भुजबळ यांना देण्यात येणार आहे. मुंडे आणि भुजबळ यांच्या कार्यालयातील टीम या प्रकरणी संपर्कात आहेत आणि या महिन्याच्या अखेरीस हा ताबा हस्तांतरित होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 17, 2025 3:47 PM
Follow Us