Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!

| Updated on: Sep 22, 2026 | 3:37 PM

तीन मुली असणाऱ्या जोडप्याला धीरेंद्र शास्त्री यांनी पर्चीवर मुलगा होणार असं सांगितलं... पण त्यांनी मुलगी झाली. ज्यामुळे धीरेंद्र शास्त्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत... यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर बाबांना पुन्हा उघड आव्हान दिले आहे.

धीरेंद्र शास्त्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. उत्तर प्रदेशातील झाशी येथील राजेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बाबांनी त्यांना पर्चीवर लिहून दिले होते की त्यांना पुत्रप्राप्ती म्हणजेच मुलगा होईल, परंतु त्यांना चौथ्यांदा देखील मुलगीच झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी नागपूरच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते हरिश देशमुख यांच्याशी संपर्क साधला. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर बाबांना पुन्हा एकदा उघड आव्हान दिले आहे. हरिश देशमुख यांनी जाहीर केले की, जर बाबांनी आपली दैवी किंवा चमत्कारिक शक्ती सिद्ध करून दाखवली, तर त्यांना समितीकडून 1 कोटी रुपयांचे इनाम दिले जाईल.

अशात पीडित व्यक्तीने महत्त्वाची मागणी केली आहे. राजेंद्र कुमार यांनी सांगितलं की, बाबांच्या दरबारात लोकांची दिशाभूल व फसवणूक होते, आणि इतर लोकांची अशी फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे. एवढंच नाही तर, आता चौथ्या मुलीचा खर्च धीरेंद्र शास्त्री उचलणार का? असा प्रश्न देखील राजेंद्र यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला.

Published on: Sep 22, 2026 3:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us