दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर

दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर

| Updated on: Jul 29, 2026 | 5:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र, या भेटीबाबत वळसे पाटील यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, “आजची भेट ही कोणत्याच प्रकारे राजकीय भेट नव्हती. मी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त भेटलो होते. ही पूर्व नियोजित भेट असून यामध्ये संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असे अनेक जण उस्थित होते.”

अलीकडच्या काळात शरद पवार, सुप्रिया सुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींमुळे विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्यातच वळसे पाटील यांच्या भेटीमुळेही अनेक अंदाज व्यक्त करण्यात आले. मात्र, वळसे पाटील यांनी ही भेट केवळ रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी असल्याचे स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

Published on: Jul 29, 2026 5:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us