tv9 Marathi Special Report | LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर
राज्यात आणि देशभरात सध्या LPG सिलेंडरसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्वयंपाकासाठी LPG वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत LPG ला पर्याय म्हणून एक नवा वायू समोर आला आहे.
राज्यात आणि देशभरात सध्या LPG सिलेंडरसाठी नागरिकांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्वयंपाकासाठी LPG वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत LPG ला पर्याय म्हणून एक नवा वायू समोर आला आहे. ‘डाय मिथाईल इथर’ (DME) हा LPG चा पर्याय ठरू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे डाय मिथाईल इथर तयार करणाऱ्या प्लांटचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे भविष्यात स्वयंपाकासाठी LPG च्या पर्यायाची उपलब्धता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील शास्त्रज्ञ तिरुमलाई वामी राजा आणि त्यांच्या संशोधकांच्या टीमने डाय मिथाईल इथरवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. या संशोधनातून डाय मिथाईल इथर हा स्वयंपाकासाठी LPG सारखाच उपयोगी ठरू शकतो, असे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, LPG वर जशी शेगडी पेटते, त्याचप्रमाणे डाय मिथाईल इथरवरही शेगडी सहज पेटू शकते. त्यामुळे भविष्यात स्वयंपाकासाठी हा वायू एक प्रभावी आणि पर्यायी इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
