Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नर्स, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे याला विष्णूनगर पोलिसांनी नोटीस बजावली असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रमेश म्हात्रे याला यापूर्वी अंतरिम दिलासा मिळाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रमेश म्हात्रे याला अधिकृत नोटीस बजावली आहे. या नोटिशीत न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धारित वेळेत आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आली असून, आरोपीने वेळेत आत्मसमर्पण न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाकडे डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.