Mumbai | Ambedkar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा,  BMC कडून छायाचित्रांचे प्रदर्शन

Mumbai | Ambedkar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMC कडून छायाचित्रांचे प्रदर्शन

| Updated on: Apr 14, 2026 | 10:58 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज देशभरात, तसेच मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात 135 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने चैत्यभूमी येथे नागरिकांची मोठी गर्दी होत असून, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक लवकरच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका तर्फे चैत्यभूमी येथे विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज देशभरात, तसेच मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात 135 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने चैत्यभूमी येथे नागरिकांची मोठी गर्दी होत असून, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक लवकरच दाखल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका तर्फे चैत्यभूमी येथे विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहेत. प्रदर्शनात बाबासाहेबांचे मुंबईतील वास्तव्य, हिंदू कॉलनीतील ‘राजगृह’ या निवासस्थानाशी संबंधित कुटुंबीय आठवणी देखील मांडण्यात आल्या आहेत. तसेच People’s Education Society अंतर्गत असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयामधील त्यांच्या अध्यापन काळातील काही दुर्मिळ क्षण छायाचित्रांमध्ये कैद करण्यात आले आहेत.
याशिवाय, सप्टेंबर 1947 मधील ऐतिहासिक छायाचित्रही प्रदर्शनात पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये लॉर्ड माऊंटबेटन, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तसेच त्या काळातील कायदामंत्री असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर मंत्रीगण दिसत आहेत. याचबरोबर भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करतानाच्या दुर्मिळ छायाचित्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, चैत्यभूमी परिसरात नागरिकांची गर्दी हळूहळू वाढत असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश या छायाचित्र प्रदर्शनातून पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे.

Published on: Apr 14, 2026 10:58 AM
Follow Us