Ashok Kharat Income Tax Raid | भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी

Ashok Kharat Income Tax Raid | भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी

| Updated on: Apr 13, 2026 | 2:30 PM

भोंदू बाबा अशोक खरात याच्या निवासस्थानी इन्कम टॅक्स विभाग आणि ईडीकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिकच्या कर्मयोगी परिसरातील तृप्तबाला येथील त्याच्या निवासस्थानी मुंबईहून दाखल झालेले पथक गेल्या अर्धा ते एक तासापासून चौकशी आणि तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

भोंदू बाबा अशोक खरात याच्या निवासस्थानी इन्कम टॅक्स विभाग आणि ईडीकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिकच्या कर्मयोगी परिसरातील तृप्तबाला येथील त्याच्या निवासस्थानी मुंबईहून दाखल झालेले पथक गेल्या अर्धा ते एक तासापासून चौकशी आणि तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार, बेनामी मालमत्ता तसेच संपत्तीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. अशोक खरात याने आपल्या भक्तांकडून आर्थिक गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचा संशय या तपासात व्यक्त केला जात आहे. ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडून संयुक्तपणे सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात आणखी कोणते आर्थिक घोटाळे किंवा मालमत्तेशी संबंधित तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील तपासात अधिक महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Apr 13, 2026 02:30 PM
Follow Us