Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले ‘असं काही’ अन् पिकला हशा… सचिन अहिरदेखील… पहा व्हिडीओ

Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले ‘असं काही’ अन् पिकला हशा… सचिन अहिरदेखील… पहा व्हिडीओ

| Updated on: Jun 30, 2026 | 3:26 PM

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी अर्ज भरला. सचिन अहिर हे उबाठा ठाकरे गटातील नेते आहेत.

यावेळी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांच्याकडून चुकून बोलल्या गेलेल्या एका शब्दामुळे हशा पिकला. त्यांनी सचिन अहिर आशा संबोधनाच्या आधी चुकून सचिन तेंडूलकर असा उच्चार केला. यानंतर त्यांनी सचिन अहिर यांचे कौतुक केले आणि त्यांच्या वक्तव्याला सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे तसेच ‘उबाठा’तील अनेक नेत्यांवर भाष्य केले. विरोधकांना टोला लगावत ते म्हणाले, ‘काही जण गेलेत आता बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात शिव्या द्यायला गेलेत, त्यांचे स्वागत सचिन अहिर यांनी केलंच आहे.’

Published on: Jun 30, 2026 3:21 PM
Follow Us