Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?

Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 07, 2026 | 4:48 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी शिवसेना शिंदे गटात नुकतेच प्रवेश केलेल्या सहा खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी शिवसेना शिंदे गटात नुकतेच प्रवेश केलेल्या सहा खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची आजची भेट ही सदिच्छा भेट होती, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. संसद अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान खासदारांची भेट घेत असतात. त्यानुसार मोदी यांनी वेळ दिला आणि त्यांची भेट झाली. या भेटीत महाराष्ट्रातील विविध प्रश्न तसेच विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवसेना ही एनडीएचा घटक पक्ष असून, नुकतेच शिवसेना शिंदे गटात आलेल्या सहा नव्या खासदारांसोबतही पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. मोदी यांनी खासदारांना चहासाठी बोलावले होते. या भेटीचा आगामी काळात मतदारसंघातील विकासकामांसाठी मोठा फायदा होईल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी Gen Z अर्थात युवा पिढीचे कौतुक केल्याबाबतही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “युवा आपल्या देशाचं भविष्य आहे. युवा देशाची शक्ती आहे,” असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सातत्याने तरुणांशी संवाद साधत असून, शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि स्टार्टअपसारख्या क्षेत्रांवर सरकारकडून काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित भारताच्या निर्मितीत तरुणांचे मोठे योगदान असेल, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यामुळे युवा पिढीला योग्य संधी आणि पाठबळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून विरोधकांवरही एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. “सभागृह सुरू आहे, तिथे चर्चा झाली पाहिजे,” असे ते म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती आणि अखेर राजीनामा झाला. त्यानंतर आंदोलक तरुण आपापल्या कामात व्यस्त असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. मात्र, विरोधक संसदेत या विषयावर चर्चा करण्यास तयार नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला. सरकार तरुणांसोबत असून, तरुणांचा आदर करूनच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. “सर्वांनी मिळून देशाला पुढे नेलं पाहिजे. संसदेत बोललं पाहिजे; फक्त राजकारण करणं योग्य नाही,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

मोदी-शिंदे भेट, सहा खासदारांची पंतप्रधानांसोबतची चर्चा आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Aug 07, 2026 4:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us