Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?

Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?

| Updated on: Jul 18, 2026 | 12:05 PM

केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्रीपदे मिळावीत, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एकूण तीन मंत्रीपदे मिळावीत, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या भूमिकेचा आग्रह धरला आहे.

केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्रीपदे मिळावीत, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एकूण तीन मंत्रीपदे मिळावीत, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या भूमिकेचा आग्रह धरला आहे. यामध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि दोन केंद्रीय राज्यमंत्री पदांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, केंद्रातील पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय सध्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. प्रादेशिक पक्षांना केंद्रीय नेतृत्वाकडून सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच विविध मित्रपक्षांना मिळणाऱ्या मंत्रीपदांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या संदर्भात केंद्र सरकार किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे.

Published on: Jul 18, 2026 12:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us