DCM Eknath Shinde | रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना, थेट…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयात उपचार घेत असतानाही प्रशासनावर लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयात उपचार घेत असतानाही प्रशासनावर लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळत आहे. कामाचा ताण आणि सततच्या धावपळीमुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, प्रकृती अस्वस्थ असतानाही एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातूनच अधिकाऱ्यांकडून राज्यातील पावसाच्या परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सर्व शाखा प्रमुख आणि अधिकाऱ्यांना पावसाळ्यात शाखा सुरू ठेवा, नागरिकांना तातडीने मदत करा आणि कोणतीही अडचण दुर्लक्षित करू नका, अशा कडक सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे.
काल रात्री गंगुबाई शिंदे सभागृहात ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे उपस्थि राहणार होते मात्र त्यांची तब्येत अचानक खालावली होती. यानंतर कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले उपस्थित होते.
