शिंदेंच्या आमदारानं अविमुक्तेश्वरानंद महाराजांना शिकवली मराठी, एकच सवाल केला अन्… बघा मजेशीर व्हिडीओ

शिंदेंच्या आमदारानं अविमुक्तेश्वरानंद महाराजांना शिकवली मराठी, एकच सवाल केला अन्… बघा मजेशीर व्हिडीओ

| Updated on: Jul 12, 2025 | 5:15 PM

शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांना मराठी शिकवल्याचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. बघा या दोघांमध्ये काय झाला संवाद?

मुंबई दौऱ्यावर असलेल्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी मराठीत संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी जगतगुरु शंकराचार्य स्वामीश्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांना मराठी शिकवल्याचे पाहायला मिळाले.  एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून मराठी भाषेवरून राजकारण केले जात असताना मुंबई दौऱ्यावर असलेल्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी मराठीत संवाद साधला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या भेटीसाठी आले असता त्यांच्याशी देखील मराठीत गप्पा मारल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर उद्यापासून शंकराचार्य यांना मराठी शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही प्रकाश सुर्वे यांनी सांगितले आहे. शंकराचार्य हे मराठीत बोलतात दीड महिन्यानंतर ते स्पष्ट मराठी बोलतील, असा दावा सुर्वे यांनी केला आहे.

Published on: Jul 12, 2025 05:15 PM