Naresh Mhaske : संजय राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं पुन्हा डिवचलं; फोटो ट्वीट करत म्हणाले, ‘सांगा बरं…’

Naresh Mhaske : संजय राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं पुन्हा डिवचलं; फोटो ट्वीट करत म्हणाले, ‘सांगा बरं…’

| Updated on: Apr 15, 2025 | 7:56 PM

नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले आहे. नरेश म्हस्के यांनी ट्वीटच्या माध्यमातून राऊतांना डिवचलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पुन्हा एकदा डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. एक ट्वीट करत एकनाथ शिंदेंशी पंगा नको, असं नरेश म्हस्के यांनी म्हणत संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आहे. नरेश म्हस्के यांनी यावेळी संजय राऊत यांचा एक व्यंगचित्रात्मक फोट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत यांच्या कपाळावर एक टिकली, कानातले आणि गळ्यातले घातल्याचे पाहायला मिळत असून राऊतांना साडीमध्ये दाखवण्यात आलंय. या फोटोसह याचा नंबर कायमचं… कोणता सांगा बरं? असा सवाल नरेश म्हस्के यांनी केलाय.

दरम्यान, संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत एक बकरा दाखवण्यात आला होता विशेष म्हणजे हा बकरा एका लाडकावर उभा होता. सोबतच ‘खबर पता चली क्या, ए सं शी गट…’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं होतं. यावरही नरेश म्हस्के यांनी पलटवार केला होता. यावेळी एक गाढव सकाळी ९ वाजता माध्यमांच्या माईक समोर बोलताना दाखवण्यात आलं आहे.

बघा नरेश म्हस्के यांचं ट्वीट

Published on: Apr 15, 2025 07:56 PM