tv9 Impact | tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं

tv9 Impact | tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं

| Updated on: May 20, 2026 | 12:41 PM

औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. TV9 Marathi ने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाला कुलूप असल्याची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आल्याचं चित्र पाहायला मिळालं. बातमी प्रसारित झाल्यानंतर काही वेळातच संबंधित कार्यालय उघडण्यात आले.

मेडिकल दुकानांनी एकदिवसीय संप पुकारल्यामुळे नागरिकांना औषधे मिळण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कार्यालय बंद असल्याचं समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, कार्यालय सुरू करण्यात आलं असलं तरी प्रशासनाने जाहीर केलेला हेल्पलाईन क्रमांक अद्याप बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती आणि मदत मिळण्यात अडचणी येत आहेत.
या प्रकारामुळे अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन किती सज्ज आहे याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

Published on: May 20, 2026 12:41 PM
Follow Us