साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

| Updated on: Aug 24, 2026 | 11:37 PM

साखरेच्या दानानं मोठी उसळी घेतल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसलाय. 50 ते 52 रुपये किलो असलेली साखर आता 75 ते 80 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे मिठाईचे दरही वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमधील स्वीट मार्ट व्यावसायिकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय. सध्या साखरेचे दर कडाडले आहेत आणि याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसलेला आहे. ऐन सणाच्या वेळेस साखरेने […]

साखरेच्या दानानं मोठी उसळी घेतल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसलाय. 50 ते 52 रुपये किलो असलेली साखर आता 75 ते 80 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे मिठाईचे दरही वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमधील स्वीट मार्ट व्यावसायिकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय. सध्या साखरेचे दर कडाडले आहेत आणि याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसलेला आहे. ऐन सणाच्या वेळेस साखरेने मोठी उसळी मारलेली आहे आणि साखर 50 रुपये 52 रुपये किलो काही दिवसांपूर्वी होती आणि तीच साखर आता 75 ते 80 रुपयांवर जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहिलं तर साखरेपासून जे पदार्थ बनवले जातात त्यांच्यात त्यांच्यात देखील प्रचंड वाढ झालेली आहे. चहा असेल, जिलेबी असेल त्याचप्रमाणे मिठाई असेल यांच्या देखील यांच्या देखील दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत स्वीट मार्टचे व्यावसायिक आहेत त्यांच्या जवळ आपण बोलणार आहोत. परिणाम तर असा होणार आहे की आता बघा आता 40-42 रुपये किलो पासून 55 झालंय आणि नंतर आता 75 पर्यंत आली आहे. त्यामुळे व्यवसायावर पण नक्कीच परिणाम होणार आहे आणि ऐन सणाला अशी जर वाढल्यामुळे लोकांना आमचा धंदा पण थोडा कमी होणार आहे कारण रेट वाढवावे लागणार, रेट वाढले की लोकांना थोडासा परिणाम होणार आहे त्याचा. व्यावसायिक जे आहेत ते देखील सांगण्यात येतंय की याचा फटका सर्वसामान्या त्याचप्रमाणे व्यवसायावर देखील बसणार आहे.

Published on: Aug 24, 2026 11:30 PM
Follow Us