Buldhana | बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?

| Updated on: Mar 27, 2026 | 5:39 PM

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील 8 पेट्रोल पंपांपैकी केवळ एका पंपावरच इंधन सुरळीत उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इतर पंपांवर “पेट्रोल-डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांपासून इंधन न मिळाल्यामुळे वाहनधारक निराश होऊन परत जात आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील 8 पेट्रोल पंपांपैकी केवळ एका पंपावरच इंधन सुरळीत उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इतर पंपांवर “पेट्रोल-डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांपासून इंधन न मिळाल्यामुळे वाहनधारक निराश होऊन परत जात आहेत. जिल्ह्यातील एकूण 166 पंपांपैकी निम्म्याहून अधिक पंप बंद असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पसरत असलेल्या संदेशांमुळे नागरिक घाईघाईने पेट्रोल-डिझेल भरून घेत आहेत. त्यामुळे उपलब्ध साठ्यावर ताण येऊन तुटवडा अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Mar 27, 2026 05:39 PM
Follow Us