Dombivli : बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर अन् डोंबिवलीत गोंधळ, मूर्तिकार गायब…
डोंबिवलीत मूर्तिकार गायब; आनंदी कला केंद्रात ग्राहकांचा गोंधळ, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल.. अवघ्या काही तासात नवीन गणपती आणायचा कुठून यासाठी मिळेल ती मूर्ती घेऊन ग्राहक निघाले घरी
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना डोंबिवलीमध्ये आनंदी कला केंद्रात गोंधळ पाहायला मिळाला. भाविक आनंदी कला केंद्रात भाविक आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी आले असता मूर्तिकार गायब असल्याने एकच गोंधळ उडाला. मूर्तिकार गायब असला तरी देखील गुन्हा दाखल झाला नसल्याने पोलिसांवरही ग्राहकांनी संताप व्यक्त केला. डोंबिवली पश्चिम महात्मा फुले रोडवरील आनंदी कला केंद्रात हा सगळ्या गोंधळ झाला. प्रफुल तांबडे असं आनंदी कला केंद्राचा मूर्तिकाराते नाव असून तो गायब झालाय. ३ ते ४ महिन्यांपूर्वी बुक केलेल्या मूर्ती न मिळाल्याने ग्राहकांचा संताप उसळला.
अवघ्या काही तासांत बाप्पाचे आगमन होणार आहे आणि मूर्तिकार जागेवर नसल्याने आता कमी वेळात नवीन मूर्ती मिळणार कुठून आणणार हा विचार करत ग्राहक मिळेल ती मूर्ती या दुकानातून उचलून नेत असल्याचे चित्र दिसतंय. तर अनेक सार्वजनिक मंडळांच्या अपूर्ण आणि न रंगवलेल्या मूर्त्या असल्याने मंडळातील सदस्याची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे पोलिसांना याबाबत काही ग्राहकांनी काल माहिती देऊन पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ग्राहकांनी पोलिसांवरही संताप व्यक्त केला.
