Girish Mahajan | ठाकरे- पवारांच्या पक्षाला माणसं मिळत नसल्याने ते दुसऱ्यांच्या आंदोलनात जातात; गिरीश महाजनांचा हल्लाबोल
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा दिला जात असताना, या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांकडून राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्रासह देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा दिला जात असताना, या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांकडून राज्यातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर आंदोलन उभे करू शकत नाहीत. “हे पक्ष मोठा गाजावाजा करतात, मात्र त्यांच्या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्या मागे कार्यकर्तेही उरलेले नाहीत. त्यामुळे जिथे कुठे आंदोलन होतं, तिथे हे जाऊन सहभागी होतात,” असा टोला त्यांनी लगावला.
महाजन यांनी पुढे दावा केला की, विरोधी पक्षांकडे स्वतंत्र जनाधार उरलेला नसल्याने ते इतरांच्या आंदोलनांचा आधार घेत आहेत. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकीय उपस्थिती दाखवण्यासाठी ते अशा आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून वाढता पाठिंबा मिळत असताना, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.