संजय राऊत म्हणजे पिसाळलेला माणूस; भाजपच्या ‘या’ आमदाराचं वक्तव्य
माझ्या शब्दावर आक्षेप घेण्यापेक्षा माझ्या भावना समजून घ्या. ते आमदार असतील, तर मीही खासदार आहे. विधिमंडळाचं महत्व मी जाणून आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरेगटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. संजय राऊत म्हणजे पिसाळलेला माणूस आहे. अख्ख्या शिवसेनेची राखरांगोळी केल्यानंतरही संजय राऊतांचं समाधान नाही! संजय राऊत यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? वारंवार खालच्या पातळीची विधानं करत आहेत. आज त्यांनी विधिमंडळाचा अपमान केला. हे योग्य नाही. जनता योग्यवेळी त्यांना उत्तर देईल, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत. संजय राऊत यांच्या “एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे”, या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
Published on: Mar 01, 2023 3:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
