NESCO Drugs Party | नाचता नाचताच कोसळले… दोघांचा मृत्यू, अनेक गंभीर, गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ

NESCO Drugs Party | नाचता नाचताच कोसळले… दोघांचा मृत्यू, अनेक गंभीर, गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ

| Updated on: Apr 14, 2026 | 1:39 PM

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. या घटनेत अमली पदार्थांच्या ओव्हरडोजमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. या घटनेत अमली पदार्थांच्या ओव्हरडोजमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी हॉल क्रमांक 5 मध्ये आयोजित या कॉन्सर्टसाठी सुमारे 2 हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला जमनाबाई बजाज इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचा एक गट सहभागी झाला होता. या गटातील काही जणांनी ‘MD’ आणि ‘MA’ प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन केल्याचे समोर आले आहे. यामध्ये काहींनी जास्त प्रमाणात डोस घेतल्याने ओव्हरडोज झाला आणि त्यांना श्वसनाचा तीव्र त्रास सुरू झाला. या घटनेत शीतल नावाच्या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी या प्रकरणात वेगाने कारवाई करत आतापर्यंत मुंबईसह कल्याणमधून सहा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आनंद पटेल याला कल्याणमधील वायले नगर येथून पहाटे अटक करण्यात आली. पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत त्याने दरवाजा उघडण्यास टाळाटाळ केली होती, मात्र अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे शहरातील हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Published on: Apr 14, 2026 01:39 PM
Follow Us