शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास… गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत

शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास… गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत

| Updated on: Jul 28, 2026 | 4:38 PM

जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी शेतकरी आणि उद्योजकांना होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या अडचणींबाबत भाष्य केले.

कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आमचे हात जोडून विनंती आहे की.. शेतकऱ्यांना थोडासा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ.. पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका.. एवढीच आमची हात जोडून विनंती आहे.” यावेळी त्यांनी पुढे असेही सांगितले, “एक वेळा मी शेतकरी म्हणून आम्ही सहन करून घेऊ उद्योजकाला लाईटचा फार त्रास होतो.”

उद्योगांवर वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात, असे सांगताना त्यांनी उद्योग बंद असतानाही मजुरांना मजुरी द्यावी लागते आणि उत्पादनही ठप्प होते, असे नमूद केले. तसेच विजेच्या अडचणींमुळे नवीन उद्योजक उद्योग सुरू करण्यापूर्वी अनेकदा विचार करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. चिंचोली येथील वीज उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात केलेल्या या वक्तव्यानंतर विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून त्यांच्या विधानाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 28, 2026 4:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us