Hardeep Singh Puri | देशात पुन्हा लॉकडाऊन?, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय?
देशात लॉकडाऊन लागू होईल या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर ट्विटद्वारे स्पष्ट केले की सरकार प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे भारतात गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर रांगा लांबल्याचे पाहायला मिळत आहे, तर सोशल मीडियावर “पेट्रोल-डिझेल लवकरच संपतील” अशा अफवा सध्या जोर धरून आहेत. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स आणि गॅसवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसायही बंद झाले असून नागरिक आता पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत तक्रारी करत आहेत.
दरम्यान, देशात लॉकडाऊन लागू होईल या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर ट्विटद्वारे स्पष्ट केले की सरकार प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आणि लॉकडाऊन लागू होणार नाही असं देखील हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं आहे. सरकारकडून सतत पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठ्याची देखरेख केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे, ज्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढाच उपयोग करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
