विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक… काय घडलं?

विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक… काय घडलं?

| Updated on: Jun 10, 2026 | 11:46 AM

अमरावती विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच रंगली असून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. काही काळापासून उमदेवाराचा पत्ता लागत नसल्याने सगळेच कार्यकर्ते हैराण झाले.

अमरावती विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच रंगली असून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. काही काळापासून उमदेवाराचा पत्ता लागत नसल्याने सगळेच कार्यकर्ते हैराण झाले. काही कारणास्तव त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. यांनतर सगळीकडे रात्रीपासूनच शोधाशोध सुरु झाली. अखेर हर्षजीत देशमुख यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने 9 जून रोजी नागपूर येथील खासगी वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही तासांपासून अमरावतीच्या राजकीय वर्तुळात हर्षजीत देशमुख गायब झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ते नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे स्पष्ट झाल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अमरावती विधान परिषद निवडणुकीत यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीकडून प्रवीण पोटे पाटील मैदानात आहेत. काँग्रेसने हर्षजीत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे, तर वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 10, 2026 11:26 AM
Follow Us