राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा…  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ

राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा… पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ

| Updated on: Jul 26, 2026 | 5:48 PM

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. विरोधकांकडून आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत थेट भूमिका मांडली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, “नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे. सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे.”

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दूसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठा स्कँडल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेलं आहे आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा-तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा. या मागणीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, या आरोपांवर संबंधितांकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 26, 2026 5:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us