राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला, शिंदेंकडे शिरसाटांची तक्रार करणार, कारण…

राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला, शिंदेंकडे शिरसाटांची तक्रार करणार, कारण…

| Updated on: May 22, 2026 | 1:22 PM

अलीकडेच महायुतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी गंभीर मुद्यावर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मतभेद लवकरच मिटतील आणि पक्ष अधिक मजबूतपणे पुढे जाईल. पक्षातील काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असली तरी पुढील आठवड्यात सर्व नेते एकत्र बसून त्यावर तोडगा काढतील, असे त्यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर पक्षातील आमदार आणि कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचेही हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यातील सर्व 42 आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध ठेवणे हेच सध्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात असल्याचे केलेल्या वक्तव्यावरही मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, या विषयावर त्यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडेही आपली भूमिका मांडली आहे. तसेच येणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: May 22, 2026 1:22 PM
Follow Us