Assembly Session | सभागृहात मोदींची नक्कल, भास्कर जाधवांना निलंबित करा, फडणवीसांची मागणी

Assembly Session | सभागृहात मोदींची नक्कल, भास्कर जाधवांना निलंबित करा, फडणवीसांची मागणी

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 2:42 PM

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी जाहीर माफी मागावी किंवा त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांचं तत्काळ निलंबन करण्यात यावं, अशी मागणी केली.

विधानसभा अधिवेशनात आज पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विधानसभेत एकच घोषणाबाजी सुरु झाली. देशाच्या पंतप्रधानांची या सभागृहात नक्कल करणे, हे शोभनीय वक्तव्य नाही. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी जाहीर माफी मागावी किंवा त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांचं तत्काळ निलंबन करण्यात यावं, अशी मागणी केली.