Marathi News Videos Imran Sheikh arrested for threatening BJP MLA Mahesh Landge, MNS leader Vasant More son and former corporator Avinash Bagwe

पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी करणाऱ्याला बेड्या, कोण आहे ‘तो’?
VIDEO | महेश लांडगे, अविनाश बागवे अन् वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणारा पोलिसांच्या सापळ्यात, कोण आहे आरोपी अन् कुठून केली अटक
पुणे : भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि पीएमसी माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत त्यांच्यांकडून खंडणी मागत होता. पुणे पोलिसांच्या रडारवर तो अनेक दिवसांपासून होता. धमकी देताना तो मुलीच्या नावाचाही वापर करत होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अनेक दिवसापासून पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकीचे फोन येत होते. राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे पुणे पोलीसांनी वेगाने तपास सुरु केला. आरोपीला पुण्यातील घोरपडी परिसरातून आरोपीला अटक केली. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहेत.
Published on: Apr 07, 2023 10:40 AM
Related Video
ट्रम्प यांची फक्त एक घोषणा.. भारतीय शेअर बाजारात आलं तुफान
अमेरिका-इराण युद्धविराम करारात भारताचा फायदाच फायदा, दोन्ही हात तुपात
'द महाराष्ट्र फाईल्स'ची 2 दिवसांत तगडी कमाई; धर्मा पाटील यांची कथा
दुसऱ्या वीकेंडला 'पेद्दी'ची बंपर कामगिरी, किती केली कमाई ?
60 वेळा आम्ही त्यांना इशारा दिला, 3 भारतीयांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने.
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद