पुण्यात आंदोलकांवर लाठीचार्ज !

| Updated on: Apr 19, 2022 | 3:57 PM

प्रशासन उपोषणाला बसून देखील ऐकत नाही म्हणून क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं कार्यकर्त्यांनी पालन केलं नाही म्हणून लाठीचार्ज करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

Follow us on

पुणे : पुण्यात कात्रज (Katraj) परिसरात पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. आंदोलक ऐकत नसल्याने हे पाऊल उचलावं लागलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गेल्या तीन दिवसांपासून कात्रज भागात पाणी (Water) प्रश्नावरून हे आंदोलन चालू आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा हा अतिशय कमी दाबानं होत असल्याची तक्रार या नागरिकांची आहे. कात्रजकरांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून इथे उपोषण (Hunger Strike) चालू आहे. प्रशासन उपोषणाला बसून देखील ऐकत नाही म्हणून क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं कार्यकर्त्यांनी पालन केलं नाही म्हणून लाठीचार्ज करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.