India Pakistan War : अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन थेट सामान्यांच्या घरावर… काचा फुटल्या तर कुठं आग लागली, बघा VIDEO

India Pakistan War : अमृतसरमध्ये पाकचं ड्रोन थेट सामान्यांच्या घरावर… काचा फुटल्या तर कुठं आग लागली, बघा VIDEO

| Updated on: May 10, 2025 | 11:53 AM

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने नागरी वस्त्यांना लक्ष्य केले आहे. बघा व्हिडीओ...

पाकिस्तानने पंजाब आणि राजस्थानच्या अनेक सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अमृतसर, फिरोजपूर आणि पोखरण या शहरांचा समावेश आहे. अमृतसरमध्ये मोठ्या स्फोटांचे सतत आवाज ऐकू येत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात येत आहे. या शहरात ब्लॅकआउट देखील करण्यात आला होता. पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता मात्र भारताकडून तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. तर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमध्ये नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले जात आहे. मात्र हे सर्व हल्ले भारतीय लष्कर उधळून लावत आहेत. दरम्यान, अमृतसरमध्ये पाकिस्तानी ड्रोन हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. हे ड्रोन भारताकडून यशस्वीरित्या पाडण्यात आले, परंतु ड्रोनचे काही अवशेष पडल्यामुळे बटाला परिसरात मोठी आग लागली आहे. या ड्रोनचे काही भाग एका निवासी भागात पडले त्यामुळे त्या परिसरात आग लागली. याचे काही फोटो व्हिडीओ समोर आले आहेत.

Published on: May 10, 2025 11:53 AM