Under 19 World Cup 2026: टीम इंडियाचा इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय

Under 19 World Cup 2026: टीम इंडियाचा इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय

| Updated on: Feb 07, 2026 | 10:13 AM

अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये भारताने इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूंत 175 धावांची स्फोटक खेळी केली, तर आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघाने हा इतिहास रचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संघाचे अभिनंदन केले.

अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये भारताने विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 412 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 311 धावांवर गारद झाला.

भारतासाठी सलामीवीर वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूंत 175 धावांची स्फोटक खेळी केली. त्याला आयुष म्हात्रेने अर्धशतकी साथ दिली. इंग्लंडकडून कॅलेब फाल्करने शतकी झुंज दिली. गोलंदाजीमध्ये आर.एस. अमरेषने तीन तर कनिकष चौहानने दोन बळी घेतले. वैभव सूर्यवंशीला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराने गौरवण्यात आले.

वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील या विजयामुळे देशात जल्लोषाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

Published on: Feb 07, 2026 10:13 AM