पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना… जंतर-मंतर परिसरातील लाठीचार्जबाबत जखमी विद्यार्थ्याने सगळंच सांगितलं

पोलिसांसह काही सामान्यांनीदेखील मुलींना… जंतर-मंतर परिसरातील लाठीचार्जबाबत जखमी विद्यार्थ्याने सगळंच सांगितलं

| Updated on: Jul 21, 2026 | 3:54 PM

नवी दिल्लीत जंतर-मंतर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. संसद मार्च रोखण्याचा प्रयत्न करताना दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले आणि त्यांनी आंदोलन सुरू ठेवले.

नवी दिल्लीत जंतर-मंतर परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. संसद मार्च रोखण्याचा प्रयत्न करताना दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले आणि त्यांनी आंदोलन सुरू ठेवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली. या घटनेत काही आंदोलक जखमी झाले.

घटनेनंतर जखमी आंदोलकांनी पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी आधी हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला. जंतर-मंतरवरील आंदोलनात काही सामान्य नागरिकांनीही मुला-मुलींना तसेच सर्व आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमींच्या आरोपांनुसार पोलिसांसह इतरदेखील या मारहाणीत सामिल होते. या संपूर्ण घटनेनंतर राजधानीतील वातावरण अधिक तापले असून आंदोलनाची देशभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर प्रशासनाची भूमिका काय असेल आणि पुढे कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 21, 2026 3:54 PM
Follow Us