Nagpur | इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम, नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय मिळणार नाही सिलेंडर

Nagpur | इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम, नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय मिळणार नाही सिलेंडर

| Updated on: Mar 10, 2026 | 11:28 AM

इराण- इस्त्रायल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा परिणाम गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवरही दिसू लागला आहे. नागपूर शहरातील काही गॅस गोडाऊनमध्ये सिलेंडर वितरणाबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गोडाऊनमध्ये स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, ज्यांनी आधी बुकिंग केलेले नाही त्यांना गॅस सिलेंडर दिला जाणार नाही.

इराण- इस्त्रायल युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा परिणाम गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवरही दिसू लागला आहे. नागपूर शहरातील काही गॅस गोडाऊनमध्ये सिलेंडर वितरणाबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गोडाऊनमध्ये स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, ज्यांनी आधी बुकिंग केलेले नाही त्यांना गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. तसेच १० मार्चनंतर गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय आता सिलेंडर घेण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्राहकाच्या मोबाईलवर ओटीपी आला असेल तरच सिलेंडर दिला जाईल, अन्यथा सिलेंडर मिळणार नाही, अशी अट गोडाऊनकडून सांगितली जात आहे. दरम्यान, अनेक नागरिक गॅस गोडाऊनवर सिलेंडरसाठी येत आहेत; मात्र बुकिंग किंवा ओटीपी नसल्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिलेंडरच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा नियम लागू करण्यात आल्याचे गोडाऊनकडून सांगितले जात आहे.

Published on: Mar 10, 2026 11:28 AM
Follow Us